ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

“ती रील बनवण्यासाठी घराच्या छतावर गेली अन्…”, पुढे असं काही झालं की तुम्हालाही हसू आवरणं होईल कठीण

मुंबई | Viral Video – आज सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतं असल्याचं पाहायला मिळत आहे. तर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचं देखील पाहायला मिळते. तर काही मनोरंजक व्हिडीओ देखील चांगलेच व्हायरलं होतं आहेत. तर नुकताच एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताक्षणी प्रत्येकाला खळखळून हसवतो. तर हा व्हिडीओ नक्की काय आहे याबाबत जाणून घेणार आहोत.

सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यामध्ये एका मुलगी घराच्या छतावर पावसात उभी राहून डान्स रील शूट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर या डान्सचा रिल्स बनवण्यासाठी तिनं कॅमेरा आधीच बसवला असून ती मध्यभागी जाऊन डान्ससाठी उभी राहते. थोड्याच वेळात गाणं सुरू होतं आणि ती डान्स करायला सुरुवात करते. त्याचवेळी तिला अपेक्षित नसतं असं काहीतरी घडतं त्यामुळे ती पटकन खाली पडते. तर ती डान्स सुरू करताना अचानक आकाशात ढगांचा जोरात गडगडाट होतो. त्या विजाना घाबरून ती हादरते आणि खाली पडल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, डान्स करणारी ती मुलगी घाबरून जाते आणि पटकन दुसरा हसणाऱ्या व्यक्तीचा चेहरा त्या व्हिडिओमध्ये समोर येतो. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर beautiful_new_pix नावाच्या पेजवरून शेअर केला असून या व्हिडीओला मोठ्या संख्येत लाईकही केलं आहे. तर त्यावर कमेंट देखील येत असून आत्तापर्यंत या व्हिडीओला एक लाख हुन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. असा हा रिल्स बनवताना त्या मुलीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये