व्हायरल व्हिडीओमुळे ट्रोल झालेला यूट्यूबर संतापला

गुरुग्राममधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये KIA सारख्या महागड्या गाडीतील दोन पुरुष रस्त्याच्या कडेला फुलांच्या कुंड्या चोरताना दिसत आहेत. जी-20 च्या दृष्टीने या कुंड्या रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आल्या होत्या. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, काही लोकांनी आरोप केला की कुंड्या चोरणारी गाडी प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव याची आहे. सोशल मीडियावर लोकांनी ट्रोल केल्यानंतर एल्विश यादव यानी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आरोपानंतर एल्विश यादव संतापला
माझ्याकडे एकही KIA कार नाही आणि आजूबाजूला जवळपास 100 वाहने एकाच वेळी धावतात, मग सर्व माझी आहेत का? मी ती कार वापरली कारण त्यात सनरूफ होते. याचा अर्थ ती माझी गाडी होती असे नाही. विचारपूर्वक ट्विट करा, मी कायदेशीर कारवाई करणार आहे. अशा भाषेत एल्विश यादव यानी आरोप करणाऱ्यांना ठणकावले आहे.
एल्विश यांच्यावर आरोप झाल्यानंतर अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर भाजपच्या सर्व नेत्यांसोबत त्यांचा फोटो शेअर करायला सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, एल्विशने विमानाने प्रवास केला तर विमानही त्यांचे होते का? आणखी एका यूजरने लिहिले की, जेव्हा एखादी व्यक्ती प्रसिद्ध होते, तेव्हा लोक त्याला चिमटे काढायला मागेपुढे पाहत नाहीत, आता एल्विश यादवला घ्या, नुकत्याच घडलेल्या घटनेवर त्याला कसे ट्रोल केले जात आहे…
गुरुग्राम पोलिसांनी सांगितले की, आयपीसी कलम 379 अंतर्गत डीएलएफ फेज 3 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमोहन यादव असे या व्यक्तीचे नाव असून तो गांधी नगर, गुरुग्राम येथील रहिवासी आहे. चोरी केलेल्या कुंड्या आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली गाडी जप्त करण्यात आली आहे.