कोणी तरी येणार येणार गं…! विराट-अनुष्कानं दिली Good News, दुसऱ्यांदा होणार आई-बाबा?
Anushka Sharma Pregnant | अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आता विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच विरूष्का आई-बाब होणार आहेत. सध्या अनुष्का प्रेग्नंट (Anushka Sharma Pregnant) असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
अनुष्का आणि विराटला पहिली मुलगी वामिका आहे. तर वामिकानंतर आता पुन्हा एकदा विरूष्काच्या घरी आणखी एका नवीन सदस्याची एन्ट्री होणार आहे. हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्का ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. त्यामुळे विराट आणि अनुष्का त्यांच्या दुसऱ्या बाळासाठी आनंदी आहेत. पण अद्याप विरूष्कानं याबाबत काहीही वक्तव्य केलेलं नाहीये.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनुष्का कुठेही स्पॉट झालेली नाहीये. तसंच नेहमी अनुष्का विराटसोबत स्टेडियममध्ये त्याच्या मॅचला जाते तसं यावेळी ती जाणार नाहीये. तर मिळालेल्या माहितीनुसार विराट-अनुष्कानं नुकतीच रूग्णालयाला भेट दिली होती. त्यावेळी पापाराझींनी त्यांचे फोटो काढले पण ते फोटो कुठेही पब्लिश न करण्याची विनंती त्यांनी केली.