क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश
बर्थडे बॉय विराटच्या बॅटमधून आले 49 वे शतक; सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी
Virat Kohli 49 Century : विराट कोहलीने अखेर आपले 49 वे वनडे शतक पूर्ण केलेच! वाढदिसालाच विराट कोहलीच्या बॅटमधून आलेले हे विक्रमी शतक खास ठरले. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात 119 चेंडूत शतक ठोकले. त्याने सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 49 शतके ठोकण्याच्या विक्रमाशी विराट कोहलीने बरोबरी केली.
त्याने इडन गार्डनवरच्या संथ आणि फिरकीला साथ देणाऱ्या आव्हानात्मक खेळपट्टीवर झुंजार शतकी खेळी केली. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 300 प्लसची धावसंख्या उभारली.