विरूष्कानं लग्नाचा सहावा वाढदिवस धुमधडाक्यात केला साजरा, शेअर केले सेलिब्रेशनचे खास फोटो
Virat Kohli – Anushka Sharma Wedding Anniversary | स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे दोघं लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. तर काल विरूष्काच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव केला होता. तर आता विरूष्काच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या (Anniversary) सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का त्यांच्या मित्र-मैत्रीणींसोबत केक कट करताना दिसत आहेत. तर या पार्टीमध्ये अनुष्का आणि विराटचा लूक खूपच सुदंर दिसत होता. अनुष्कानं ब्लॅक गाऊन घातल्याचं दिसत आहे तर विराटनं ब्लू शर्ट आणि ब्लॅक पँट असा लूक केल्याचं दिसत आहे.
अनुष्कानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विराटचा आणि तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनुष्का विराटला मिठी मारताना दिसत आहे. तर तिनं हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “प्रेमानं भरलेला दिवस..इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करायला थोडा उशीरच झाला.” सध्या अनुष्काच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यास सुरूवात केली आहे.
https://www.instagram.com/p/C0vvfm1ADdI/?utm_source=ig_web_copy_link