ताज्या बातम्यामनोरंजन

लग्नाआधीच गरोदर होती देवोलिना? स्पष्टीकरण देत म्हणाली, “आयुष्यात इतकं…”

मुंबई | Devoleena Bhattacharjee – ‘साथ निभाना साथिया’ ही छोट्या पडद्यावरील मालिका प्रचंड गाजली होती. याच मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारलेली आभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली आहे. तिनं गुपचूप लग्न उरकलं आहे. दवोलिना भट्टाचार्जीनं तिचा प्रियकर शहनवाज शेख याच्यासोबत लग्नगाठ बांधली. यानंतर सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं.

तिनं अगदी साध्या पद्धतीनं लग्न का केलं आणि गुपचूप लग्न का केलं असे सवाल देवोलिनाचे चाहते तिला विचारत होते. तसंच काहींनी तर तिची आलिया भट्टशी तुलना केली आहे. ज्यात असा दावा करण्यात आला आहे की तिनं घाईघाईत लग्न केलं कारण ती लग्नाआधी गरोदर आहे. अशा अनेक अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. आता यावर देवोलिनानं सर्व ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

ई-टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत देवोलिनानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “मला कोणालाच काहीही स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. पण आजूबाजूला असे काही लोक आहेत ज्यांना वाटतं की मी गरोदर आहे आणि म्हणूनच मी अचानक लग्न केलं. तुम्ही एखाद्याला त्रास देण्याची एकही संधी सोडू शकत नाही ही वेगळ्याच पातळीवरची हिपोक्रेसी आहे”, असं देवोलिना म्हणाली.

पुढे ती म्हणाली, “कोणालाच ही लोक आनंदी पाहू शकत नाही आणि हे कधीकधी निराशाजनक असतं. कुणाला कुणाच्या आयुष्यात इतकं लक्ष देण्याची गरज काय आहे? पण नंतर मी या कमेंट्सवर हसले आणि हा विषय सोडून दिला. मला खरंच माहिती नाही की पुढे काय होणार आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये