ताज्या बातम्यादेश - विदेश

हे काय नवीनच! आता लग्न करूनही तुम्ही राहू शकता सिंगल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

टोकियो | Weekend Marriage – लग्न (Marriage) म्हणजे सात जन्मांचं बंधन असतं. नवरा आणि नवरीनं सप्तपदी घेतल्यानंतर ते सात जन्मांसाठी एकमेकांचे होतात. पण आता लग्न करूनही तुम्ही सिंगल राहू शकता. तुम्हाला हे ऐकून नक्कीच धक्का बसला असेल. पण होय हे अगदी खरं आहे. जपानमध्ये लग्नाचा एक अनोखा ट्रेंड सुरू आहे. ज्यामध्ये फक्त वीकेंडपुरतं लग्नाचं बंधन असतं. म्हणजेच फक्त शनिवार आणि रविवारी लग्नाचं बंधन. त्यानंतर बाकीचे दिवस पती-पत्नी एकमेकांपासून पूर्णपणे वेगळं राहून आपलं आयुष्य जगतात. जपानमध्ये सध्या हा वीकेंड मॅरेज (Weekend Marriage) ट्रेंड चांगलाच लोकप्रिय होत आहे.

वीकेंड मॅरेज हा ट्रेंड नक्की आहे काय?

वीकेंड मॅरेज (Weekend Marraige Trend) म्हणजे असं लग्न की जे केवळ वीकेंडपर्यंत वैध असते. या ट्रेंडमध्ये लग्न झालेली जोडपी वीकेंडला एकमेकांसोबत राहतात आणि बाकीचे दिवस ते एकमेकांपासून दूर राहतात. म्हणजेच ते लग्नापूर्वी जसं सिंगल राहत होते अगदी तसंच. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की लग्नानंतर त्यांना पर्सनल स्पेस मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर हा वीकेंड मॅरेजचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्या ट्रेंडमधून तुम्ही सिंगल लाईफचाही आनंद घेऊ शकता.

वीकेंड मॅरेज हा पर्याय ज्या लोकांचे जॉब प्रोफाइल एकमेकांपेक्षा वेगळे आहेत त्यांच्यासाठी चांगला आहे. बहुतेक जोडप्यांचे कामाचे तास एकमेकांसारखे नसतात. तर काहींचे नोकरीचे ठिकाण देखील एकमेकांपासून दूर किंवा दुसर्‍या शहरात असते. त्यामुळे अशी जोडपी वीकेंडला एकत्र राहून क्वॉलिटी टाईम स्पेंड करू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये