Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई
“तुम्ही काय हकालपट्टी करणार, मीच शिवसेना सोडली”

मुंबई – पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत विजय शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वदेखील रद्द केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. यावर शिवतारेंनी पक्षाला प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेनेत उभी फूट पडण्यास संजय राऊतच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच सर्व काही घडत आहे. त्यांची उद्धव ठाकरेंबाबतची निष्ठा किती आणि शरद पवारांबाबतची निष्ठा किती हे सर्वांना माहित आहे, असा खोचक टोला विजय शिवतारे यांनी लगावला आहे.
दरम्यान, दरम्यान, शिवसेनेचे पुण्यातील नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत आणि आता शिवतारेंची हकालपट्टी करण्यात आली.