ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

दादा भुसेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत भडकले; म्हणाले, “हे दीडशहाणे मंत्री…”

मुंबई | Sanjay Raut – संपूर्ण देशभरात टोमॅटो महागला असतानाच आता कांद्याचे दरही वाढणार आहेत. कांद्याच्या दरवाढीवरून काल (21 ऑगस्ट) राज्याचे माजी कृषी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. कांदा 20-25 रूपयांवर गेला आणि तो जर कोणाला परवडत नसेल तर त्याने दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडतं? असा सवाल दादा भुसेंनी केला होता. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यामध्ये आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दादा भुसेंवर सडकून टीका केली आहे .

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “सामान्य माणसाला कांदा आणि भाकरी खायची आहे. यांच्या घरी कांद्यांची पोती आहेत. कांदा हे श्रीमंतांचं खाणं नसून गरिबांचं आहे. आमचं म्हणणं हे आहे की शेकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा, सामान्य घरातील गृहीणी कांद्यापासून वंचित राहू नये.”

“सरकार जर म्हणत असेल की एखादी गोष्ट मिळत नाहीये तर ती खाऊ नका, तर मग हे सरकार कशासाठी आहे? कालपर्यंत हे दीडशहाणे मंत्री महाराष्ट्राचे कृषीमंत्री होते. या राज्यातील परिस्थिती त्यांना माहिती तरी आहे का?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

“आपण जनतेशी कसंही वागू शकतो, कसंही बोलू शकतो, काहीही सल्ले देऊ शकतो हा मस्तवालपणा आहे. खोक्यातून हा मस्तवालपणा निर्माण झाला आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाहीये. एखादी गोष्ट जर मिळत नसेल म्हणून ती खाऊ नका, हे सांगण्यापेक्षा तुम्ही ती उपलब्ध करून द्या”, असंही संजय राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये