शिव ठाकरे लग्न कधी करणार? स्वत:च दिलं स्पष्टीकरण; म्हणाला, “आता माझं…”
मुंबई | Shiv Thakare – सध्या ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) चांगलाच चर्चेत आहे. शिव ठाकरेच्या चाहत्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. तो त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तसंच शिव आता ‘खतरों के खिलाडी 13’ या शोमध्ये पाहायला मिळत आहे. शिव हा त्याच्या कामामुळे तर चर्चेत असतोच पण सोबतच तो त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. शिवच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमी सुरू असतात. तर आता त्यानं एका मुलाखतीत त्याच्या लग्नाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
शिवनं नुकतीच ‘रेडिओ सिटी मराठी’ या चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याला ‘तु लग्न कधी करणार आहेस?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शिव म्हणाला की, खरं सांगायचं झालं तर आता तर माझं करिअर सुरू झालं आहे. माझ्या चेहऱ्यावर आता जे हसू आहे ते उगाच नको ना जायला. नॅचरल हसू चेहऱ्यावर राहिलं पाहिजे, असं सांगत शिवनं लग्नाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिव हा अभिनेत्री डेडी शाहला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. बऱ्याचदा त्या दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. मात्र, आता डेजीनं शिवला डेट करत नसल्याचं सांगितलं आहे.