ताज्या बातम्यारणधुमाळी

आठ दिवस कुठे होतो? अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “मी नाराज…”

पुणे | Ajit Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांसमोर आले आले नव्हते. तसंच खासदार सुप्रिया सुळेंबद्दल (Supriya Sule) कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वापरलेल्या अपशब्दांनंतरही अजित पवारांनी काहीही भाष्य केलं नव्हतं. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. यासंदर्भात आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आठ दिवसांनी माध्यमांसमोर आल्यानंतर अजित पवार यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. “मी नाराज असल्याच्या अफवा आहेत. पाच दिवस मी आजारी होतो. त्यामुळे मी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली नव्हती. खोकला सुरू झाला होता, त्यात प्रकृती बरी नव्हती. आता तब्येत ठीक आहे. नंतर मी काही दिवस दौऱ्यावर होतो. पण इथं काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या”, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अजित पवार गेले काही दिवस माध्यमांसमोर आले नव्हते. तसंच ते शिर्डी येथील शिबिरात अनुपस्थित होते. त्यामुळे दादा नाराज तर नाहीत ना, गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून राहा रे कुछ तो गडबड है, असं खोचक ट्विट मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी केलं होतं. तर शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी अजित पवारांची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, या चर्चांना आता अजित पवारांनी पुर्णविराम दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये