शुभमन गिल नेमकं कोणाला डेट करतोय? सारा अली खाननं केला खुलासा; म्हणाली…
Shubman Gill | मागील काही दिवसांपासून भारताचा स्टार खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) हा नेमंक कोणाला डेट करतोय याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. कारण त्याचं नाव सारा अली खान (Sara Ali Khan) आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोबत जोडलं जातं. त्यामुळे या दोघींपैकी तो नेमकं कोणाला डेट करतोय याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम होता. पण आता याबाबत सारा अली खाननं स्वत: खुलासा केला आहे.
सारा अली खान आणि अनन्या पांडे करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. नुकताच याचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या प्रोमोत सारा शुभमन गिल नेमकं कोणाला डेट करतोय याबाबत सांगताना दिसत आहे.
या प्रोमोमध्ये करण जोहर सारा अली खानला तिच्या आणि शुभमन गिलच्या डेटिंगच्या चर्चांबाबत विचारतो. यावर उत्तर देताना सारा म्हणते की, संपूर्ण जग साराच्या मागे लागलं आहे. तसंच ती शुभमन आणि सारा तेंडुलकर हे एकमेकांना डेट करत असल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगते.
https://www.instagram.com/reel/CzSvjOZyeCk/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, सारा अली खाननं शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या डेटींगबाबत अप्रत्यक्षपणे सांगितल्यामुळे आता सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. तसंच चाहत्यांच्या मनातील संभ्रम देखील दूर झाल्याचं दिसतंय.