विधी संघर्षग्रस्तांचे वाढते प्रमाण…
वाढत्या संख्येला जबाबदार कोण ?
बालक हा छोटे मोठे गुन्हे करत करत गंभीर गुन्हे करण्यास मागे पुढे पाहत नाही. अशा बालकांच्या बाबतीत बालक हे गुन्हेगार वृत्तीकडे वळत आहे. शाळेत येत नाही, दिलेले होमवर्क करत नाही, मुलांशी भांडणे करतो. वेळप्रसंगी मादक द्रव्याचे सेवन करीत असल्याने अशा मुलांना शिक्षकही समुपदेशन करीत नाही.
विधीसंघर्ष हा बालकाच्या गुन्ह्यातील सहभागीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. पूर्वी मोठ्या शहरांतून विधीसंघर्ष बालकांच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसत होते. पण आता ते तालुका जिल्हा या पातळीवर सुध्दा विविध गंभीर गुन्ह्यात विधीसंघर्ष बालकांचा सहभाग होत असल्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
अपराध रिकार्ड ब्युरो : यांनी विधीसंघर्ष आकडेवारी सन २०२० मध्ये विविध गुन्ह्यात सहभागी असलेल्या बालकांची संख्या १,२८,५२३ होती. ती २०२१ च्या रिपोर्टमध्ये १,४४,४०४ वर गेली. तात्पर्य एका वर्षात विधीसंघर्ष बालकांच्या संख्येत १६.२ वाढ झाले, असे दिसून येते. ही संख्या गुन्ह्याचा एफ. आय. आर. मध्ये नोंद झालेल्या बालकांची संख्या आहे.
अनेक प्रकरणात विधीसंघर्षबाबत अनेकजण पोलिसांत तक्रारी करत नाहीत. विधीसंघर्ष बालकांच्या अनेक मोठ्या शहरांतून टोळ्या निर्माण झाल्या आहेत. त्यांच्या टोळीवर नियंत्रण कसे ठेवावे, हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कारण विधीसंघर्ष बालकांच्या कायदेशीर कार्यवाही करताना बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये दिलेल्या विधीसंघर्ष बालकाच्या बाबतीत गुन्ह्याच्या तपास करतांना कायद्याने दिलेल्या अधिकाऱ्याचे व नियमांचे पालन करुन त्यांच्यावर कार्यवाही करावी लागते. विधी संघर्षग्रस्त बालकांना मिळण्याऱ्या कायदेशीर गोष्टीचा लाभ कसा मिळतो याबाबत अनेक विधीतज्ज्ञ मंडळी मोठ्या गुन्हेगार टोळीत भाई लोकांना कायदेशीर माहिती देवून विधीसंघर्ष बालकांचा उपयोग करुन त्यांची टोळी तयार करुन त्यांच्यामार्फत बलात्कार, अपहरण, करण्याचे काम कसे कायदेशीर व आपल्यासाठी फायदेशीर आहे हे समजावून सांगतात. अनेक दादा लोक ह्या गोष्टीचा फायदा घेत आहेत. राजकीय लोक गुन्हेगार वृत्तीचे लोक तोडफोड, गंभीर अपहरण, कब्जा अशा गोष्टी विधी संघर्षग्रस्त बालकांना आर्थिक मदत, कायदेशीर मदत व संरक्षणाची हमी देवून करून घेतात. त्यामुळे सामाजिक संतुलन व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात. पोलिसांना अशा टोळ्यांवर नियंत्रण ठेवताना त्यांना दिलेल्या कायदेशिर तरतुदचे पालन करुन व विधी संघर्षग्रस्त बालकांच्या टोळीवर नियंत्रण करणे एक तारावरची कसरत केल्यासारखे आहे.
बालकावर नियंत्रण ठेवणे गुन्हेगारी वृत्तीकडे न जाणे याची जबाबदारी सर्वप्रथम शाळा, नातेवाईक, परिसरातील लोक, मित्रमैत्रीण, सामाजिक सेवाभावी संस्था, कार्यकर्ते, राजकीय पुढारी, पोलीस प्रशासन व प्रशासनातील बालकांबाबत विविध योजना, यंत्रणा यांनी सर्वसमावेषक योजना तयार करुन तिची अंमलबजावणी काटेकोरपणे केली तर नक्कीच विधी संघर्षग्रस्त बालकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
विधीसंघर्ष बालक हा गुन्हेगारी जगताकडे प्रवृत्त होते यांची कल्पना सर्वप्रथम कुंटुबातील व्यक्तिच्या लक्षात येणे अंत्यत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण बालकावर संस्कार प्रथम होतात ते मित्रमैत्रिणी, शाळा यांच्या संपर्कात. नंतर तो बालक प्रथम सुरुवातीस लहान-लहान गुन्हे करतो. बालकांच्या आचरणात फरक पडतो. उदा :- आई-वडिलांचे बोलणे न ऐकणे, भांडण, अवाजवी पैशांची मागणी, रात्रभर घरातून बाहेर राहणे, एकटे – एकटे मोबाईल वर गुन्हेगारी विषयक मालिका पाहणे, असे प्रकार करतो. गरजा भागवण्यासाठी छोट्या मोठ्या चोऱ्या घरातील किंवा शेजारी-पाजारी किंवा शाळेतील मित्र मैत्रिणीचे वस्तू चोरणे, असे प्रकार करतो. त्याबाबत विचारले असता योग्य उत्तर न देता आरडाओरड करणे, असे प्रकार करतो. शाळेत न जाणे, चोऱ्या, लैंगिक अपराध, मुलीची छेडछाड, व्यसनाधीनता, अशा गरजा भागवण्यासाठी मोटारसायकल चोरी व लहान मोठ्या चोरी सुरु करतो.
गुन्हेगार वृत्तीच्या मुलांच्या संगतीत राहणे पसंत करतो. काही वेळेस मादक सेवन करुन घरी येतो, असे प्रकार करणे म्हणजे तो बालक गुन्हेगार वृत्तीकडे वळत असल्याचे लक्षण आहे. पालकांच्या लक्षात आपल्या मुलांमध्ये होणारे बदल लक्षात येणे हे अंत्यत महत्त्वाचे बाब आहे. अशा बालकास योग्यवेळी अंकुश ठेवला तर तो गुन्हेगार वृत्तीकडे प्रवृत्त होणार नाही. पण मुलांची गुन्हेगारी वृत्तीची चुक लक्षात येवून पण प्रेमापोटी चुका पोटात ठेवून कृत्याचे समर्थन करतात, त्यावेळी बालकास जाणीव होते की, आपण केलेले कृत्ये योग्य आहे. आई-वडील काही बोलत नाही म्हणून त्यांची गुन्हेगार वृत्ती वाढीस लागते.
अनेक आई वडील बालकाकडून गुन्हे करुन घेतात. व त्यांच्या येणाऱ्या पैशांवर काम न करता जगत असतात. जर कोणी बालकाची तक्रार घेवून आल्यास तक्रार करणाऱ्यास दोषी ठरवतात व माझ्या मुलांची काही चुक नाही, तो लहान आहे, तुम्ही मुलाची बदनामी करत आहात, अशा प्रकारचे वादविवाद करतात. त्यामुळे शेजारी, नातेवाईक, समाजातील प्रतिष्ठित लोक अशा बालकांबाबत सांगत नाही. किंवा बालकाला सुध्दा काही उपदेश करण्याचा प्रयत्न करीत नाही. याचा फायदा घेवून बालक हा छोटे मोठे गुन्हे करत करत गंभीर गुन्हे करण्यास मागे पुढे पाहत नाही. अशा बालकाच्या बाबतीत बालक हे गुन्हेगार वृत्तीकडे वळत आहे. शाळेत येत नाही, दिलेले होमवर्क करत नाही, मुलांशी भांडणे करतो. वेळप्रसंगी मादक द्रव्याचे सेवन करीत असल्याने अशा मुलांना शिक्षकही समुपदेशन करीत नाही.
(पूर्वार्ध…)
तसेच अशा बालकाच्या शाळेतील मित्र मैत्रीणी यांनी पण काही सुधारा करण्याबाबत (गुन्हेगार वृत्ती सोडण्याबाबत उपदेश केला तर त्यास भांडण करतो वेळ प्रसंगी मारहाण करतो. त्यामुळे मित्र मैत्रीण सुध्दा अशा बालकांच्या बाबतील फारसे अनुकूल नसता. बालका ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील सुज्ञ नागरीक सुध्दा बालकाला सुधारण्याबाबत उदाशीनता दाखवतो किंवा बालकांनी केलेल्या गुन्हेची माहिती पोलीसांना देत नाही किंवा कुंटुबाला सांगत नाही. त्यामुळे अशा बालकावर अंकुश राहत नाही. अनेक शहरातुन गावातून चौका चौकात कटयावर टपरीवर नाक्यावर अनेक गुन्हेगार वृत्तीचे लोक बेकार बसुन येणारा जाणाऱ्या मुलीची म्हाताऱ्या व्यक्तिची टिंगल करणे दारु गांजा पिणे पत्ते खेळणे मारा माऱ्या करणे खंडणी वसुल करणे व इतर गुन्हेगार टोळीपेक्षा आपली टोळी कशी मोठी आहे अशा गुन्हेगार कृत्तीचा गप्पा मारत असतात. अशांच्या शेजारी अनेक मुले शाळेत न जाता दिवस दिवस त्याच्या सोबत फिरत असतात, त्यांची छोटे मोठे कामे करत असतात, जर अशे होत असतांना अनेकांच्या लक्षात या गोष्टी येतात पण कोणीही काही बोलण्याचे धाडस करत नाही. जर एखादयाने धाडस केले तर त्यास शिवीगाळ वेळे प्रसंगी मारहाण केली जाते. चुकन अशा वस्तीत सामाजिक कार्यकर्ता, किंवा सामाजिक संस्था विधी संघर्षग्रस्त बालकांना समुपदेशन करणे किंवा काही योजनेची माहिती देण्यासाठी लोक येतात. त्यावेळस परिसरातील लोक अशा लोकाना मदत करण्या ऐवजी अडचणी निर्माण करतात जर प्रत्येकांनी सामाजिक जाणीवाची भान ठेवून विधी संघर्षग्रस्त बालकांच्या वृत्तीना रोखण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच विधी संघर्षग्रस्त बालकांची संख्या कमी होईल.
जेव्हा बालकामध्ये गुन्हेगारी प्रथम दिसुन येते त्यावेळेस कुंटूबाने व समाजाने दुलर्क्ष केले तर बालका मधील गुन्हेगार प्रवृती वाढून जावून गंभीर गुन्हे करण्याची प्रवृत्ती वाढते. बालकांना वेळीस समज किंवा शिक्षा झाली तर तो गुन्हेगारी वृत्ती पासून दुर होऊ शकतो. जर पालकांनी मुलांचे केलेले गुन्हेगारी कृत्ये पाठीशी घातले तर किंवा त्यांचे समर्थन केले तर बालकांतील गुन्हेगारी वृत्ती कमी न होता वाढत जावून लहान लहान गुन्हे करण्यास सुरुवात करुन तो गंभीर गुन्हे करण्यास सुरुवात करतो. व गुन्हेगार विश्वात केव्हा त्यांचा प्रवेश झाला हे त्यांच्या लक्षात पण येत नाही. आणि तो पण येण्याच्या मनस्थीतीत नसतो.
बालक हे बालकाच्या मनावर पिक्चर, सोशल मिडिया, जाहिराती, व्हिडीओ गेम, व समाजात दंबगगीर (दादागीरी) करणारे लोक यांना मिळणारी समाजातील प्रतिष्ठा त्यांचे राहनीमान त्यांच्या मागे पुढे फिरणारे लोक तेच पुढे समाजाचे नायक म्हणुन समाजात वावरत असतात, अशा अनेक लोक ग्रामपंचायतचे लोक सभेपर्यत व लोकप्रतिनीधी म्हणुन निवडुन येतात अनेक जण मंत्री, शासनातील महत्वाचे पदे भुषवत असतांना दिसुन येतात. अशा व्यक्तीचा कळत नकळत विधी संघर्षग्रस्त बालकांच्या मनावर परिणाम होतो. व तो आपली टोळी तयार करुन अशा लोकांच्या संपर्कात येतो. असे लोक अशा विधी संघर्षग्रस्त बालकांच्या टोळीस आर्थिक मदत व हात्याऱ्याचा पुरवठा, महागडया वस्तु, वाहन पुरवतात, वकील पोलीसांनाकडुन होणारा त्रास याबाबत संरक्षण देतात व आम्ही केलेल्या सहकार्या बदल तुम्ही आम्ही सांगितले कामे करावे असे आदेश देवून विधी संघर्षग्रस्त बालकाच्या टोळयाकडुन खुन, खंडणी, अपहरण, बलात्कार जागेवर कब्जा घेणे, दुसऱ्या टोळीवर हाला करणे निवडणुकीच्या काळात अशा टोळीकडुन अवैधे कामे करुन घेतात. समाजाने अंर्तमुर्ख होऊन विचार करण्याची वेळ आहे. समाजात विधी संघर्षग्रस्त बालकाचे प्रमाण वाढत आहे. अशा बालकांना वेळीच समुपदेशन करुन योग्य ते समज देवून वेळे प्रसंगी शिक्षा देवून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणे हि प्रत्येकांची जबाबदारी आहे.
विविध शहरात विधी संघर्षग्रस्त बालकाच्या टोळ्या वेगवेगळया नांवाने प्रसिध्द आहेत. उदा. पुण्यामध्ये कोयता गॅग यानावाने प्रसिध्द आहे, जेव्हा अशा टोळीने गुन्हा केल्यास पोलीसावर मोठया प्रमाणात प्रसाद माध्यमावर टिका होतात. नक्कीच पोलीसांचे कतृव्य आहे समाजात सामाजीक संतुलन व कायदा सुव्यवस्था राखणे व गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर नियंत्रण ठेवणे अद्यकतृव्ये आहे पण समाजातील लोकांनी सुध्दा विधी संघर्षग्रस्त बालकांवर अंकुश ठेवणे तितकेच आवश्यक वाटते.
यांचा कळत न कळत परिणाम बालकावर गुन्हेगारी विश्वाकडे आकृर्षित करण्यात मोठा वाटा आहे. समाजात गुन्हेगार दंबग गिरी वृत्तीच्या लोकांचा यांना समाजात मिळणारा माण त्यांचा होणारा उध्दव-उध्दव व गुन्हेगार वृत्तीचे ग्राम पंचायत पासून लोकसभे पर्यत होणारे लोक प्रतिनिधी यांचा पण अप्रत्यक्ष रित्या बालकांना गुन्हेगार असुन त्यांना मिळणारे राजकिय पेद संरक्षण समाजात दबदबा यागोष्टीचा पालके पण आपण गुन्हे करुन अशा दबदबा राजकिय वतन व मिळणारी प्रसिध्दी समाजात या गोष्टी गुन्हेगार विश्वातून मिळू शकतो. या भाषणेतून विधीसंघर्ष बालक, संघटित गुन्हेगार टोळीचा संपर्कात येऊन ते मोठया गॅग साठी विधीसंघर्ष बालकाची गॅग खंडणी दंगे करणे, खुण बलात्कार अपहरण अशा गुन्हेकरुन स्वतःची एक योग्य व्हावी म्हणुन व स्वतः एक टोळी निर्माण व्हावी व समाजात हदशत निर्माण करतात पोलिसापुढे आव्हाण निर्माण करतात अशावेळी पोलिसानी त्यांच्यावर अंकुश ठेवणे व कार्यवाही करणे समाजाची सुरक्षा कानुन व्यवस्था आबादित ठेवणे हे पोलिसाचे कर्तव्य आहे. यात शंका नाहि पण समाजाने अंतरमुख होऊन विविध शहरात विविध नावाने उदा. पुणे कोयता गॅग, व इतर शहरात विविध नावाने प्रसिध्द असलेल्या विधीसंघर्ष बालकांच्या गुन्हेगारी वृत्तीच्या टोळीवर अंकुश सर्व क्षेत्रात प्रयत्न झाल्यास त्यांच्यावर नक्किच अंकश बसेल व विधीसंघर्ष बालकांच्या संख्येत कमी होईल व त्यांच्या वृत्तीत सुधार होईल यात शंका नाही.