ताज्या बातम्यारणधुमाळी

‘…दुध का दुध पानी का पानी होणारच’; जयंत पाटलांचा भाजपाला इशारा

रायगड : आजपासून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातून सुरवात झाली आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मविआचे निवडून आलेले आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते शक्य झाले नाही म्हणून ईडी, इन्कम टॅक्सची धाड टाकली जात आहे. ईडी काय महाराष्ट्रातच आहे का? भाजपाचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का? असा रोखठोक सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, “धाडसत्रांना घाबरत नाही म्हणून काही लोक आणखी अस्वस्थ झाले आणि त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेकीचा हल्ला घडवून आणला. शरद पवार नेहमीच एसटी कामगारांसाठी लढले, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, मात्र काहींनी एसटी कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानात चिथावणीखोर भाषणे दिली. त्यातून हे घडले.”

“आता सध्या अटक झालेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. दुध का दुध पानी का पानी होणारच, पण इतरांवरही कडक कारवाई करावी,” अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर चालतो. जातीयवादी पक्षांना राष्ट्रवादीच उत्तर देऊ शकते हे लोकांना आता पटले आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे जयंत पाटील म्हणाले, “‘Everyday is chance to get better’ त्यामुळे निराश व्हायचं नाही, संघर्ष असतोच. मात्र, त्या संघर्षानंतर विजय आपलाच असतो. म्हणून खचून जावू नका. २०१९ साली विधानसभा निवडणुकीचा काळ होता, सर्व नेते सोडून जात होते. पक्ष काही टिकणार नाही, १०-१५ आमदार निवडून येतील असे भाकित केले गेले मात्र आपले नेते शरद पवार बाहेर पडले आणि काँग्रेस व राष्ट्रवादीने १०० आमदार निवडून आणले.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये