त्या 14 दिवसांमध्ये काहीच का झालं नाही? मणिपूर प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Manipur Viral Video – मणिपूरमध्ये (Manipur) महिलांवरील अत्याचार आणि हिंसाचारामुळे संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. तसंच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. तर सोमवारची सुनावणी आता संपली आहे. या सुनावणीवेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी राज्य सरकारला कठोर सवाल केले आहेत.
यावेळी सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारलं विचारलं की, व्हायरल झालेल्या व्हिडीओत मणिपूरमधील दोन महिलांची विवस्त्र धिंड आणि त्यांच्यावर बलात्कार झाल्याची घटना समोर आली. हा सगळा प्रकार सुरू असताना पोलीस काय करत होते? तसंच 4 मे रोजी घडलेल्या घटनेवर पोलिसांनी 18 मे रोजी एफआयआर नोंदवला. मग मधले 14 दिवस काहीच का झालं नाही? असे सवाल न्यायालयानं विचारले आहेत.
तर पुढे सरन्यायाधीशांनी सरकारला आणखी कठोर सवाल केले आहेत. जी 19 वर्षीय महिला मदत शिबिरात आहे तिचे वडील आणि भाऊ मारले गेल्याने ती घाबरली आहे, त्यामुळे आता तिला न्यायालयीन प्रक्रिया शक्य होईल का? तसंच पीडित महिला आहेत त्यांचे जबाब कोण नोंदवणार? असे कठोर सवालही न्यायालयानं सरकारला विचारले आहेत.