ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“माझी निवडणुकीची हौस भागली आहे, त्यामुळे मी…”, खासदार उदयनराजे राजकारणातून संन्यास घेणार?

सातारा | Udayanraje Bhosale – खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. माझी निवडणुकीची हौस भागली. शासनाचे निवृत्तीचे वय असते, तेच राजकारणात हवे, असे खासदार उदयनराजे म्हणाले. तर असाच काहीसा सल्ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना देखील दिला आहे. पवारांनी सर्व पदे भोगली, त्यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे, असे उदयनराजेंनी म्हटले. ते शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधत होते.

यावेळी खा. उदयनराजे म्हणाले की, “माझी निवडणुकीची हौस भागली. मी आता प्रचारक म्हणून काम करतो. बस झाले आता, माझे वैयक्तिक मत आहे की, शासनात कर्मचाऱ्यांचे जे निवृत्तीच वय असते, ते खरे तर राजकारण्यांनासुद्धा लागू झाले पाहिजे. पुढे त्यांनी शरद पवार यांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, शरद पवारांनी खरंतर मार्गदर्शकाच्या भूमिकेत असले पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिपदे, एवढी वर्षे उपभोगली, आता बस करावे.

माझी निवडणुकीची खाज भागली आहे, त्यामुळे बघता बघता पन्नाशी कधी ओलांडली हे समजले नाही. राजकारणामध्ये निवृत्तीचे एक निश्चित वय असले पाहिजे, असेही उदयनराजेंनी नमूद केले आहे. सातारा नगरपालिकेबाबत भाजप आमदार शिवेंद्रराजेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, सातारा नगरपालिकेची ईडीची चौकशी लावावी, असा उपरोधिक टोला देखील उदयनराजेंनी या वेळी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये