थंडीच्या दिवसात प्या गरमागरम पेय
Winter Drinks : थंडीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. संध्याकाळच्या वेळेस वातावरणात गारवा वाढू लागला आहे. हिवाळ्यामध्ये आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारी उद्भवतात. तापमानात घट झाल्यानं सर्दी-खोकला, ताप, त्वचेशी संबंधित विकार इत्यादी त्रास निर्माण होतात. हिवाळा येताच आपल्या शरीराची स्थिती बदलू लागते. त्यामुळे शरीराचे तापमान कमी होऊन लोक या हंगामात जास्त आजारी पडतात. गरम-गरम कॉफी, गरम कपडे आणि गरम पाणी यांची या हवामानात मोठी गरज असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात काही गरमागरम आणि हेल्दी पेय प्या ज्याने तुमचे शरीर निरोगी राहील.
केशर दूध
केशरचे दूध विशेषतः थंडीच्या दिवसात प्यायले जाते. किंवा सर्दी झाल्यास केशर दूध पिणे गुणकारी ठरते. केशर त्याच्या स्वादिष्ट चवीसाठी ओळखले जाते आणि ते अँटिऑक्सिडंट्स समृद्ध असेच आहे. त्यामुळे केशर दूधाचे सेवन करणे थंडीत फायदेशीर ठरू शकते. केशर दूधाची चव अधिक वाढवायची असेल तर, तुम्ही यामध्ये इतरही हेल्दी नट्स टाकू शकता.
हळदीचे दूध
हळदीच्या दूधाला सोनेरी दूध म्हणून ओळखले जाते. शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. कडाक्याच्या थंडीत मौसमी आजार टाळायचे असतील तर हळदीचे दूध बनवून ते प्यावे. विशेषत: हिवाळ्यात शरीराला ऊब देण्यासाठी तुम्ही या दुधाचे सेवन करू शकता. हळदीचे दूध हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रामबाण उपाय असल्याचेही सांगितले जाते.
बदाम दूध
बदाम दूध स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पेय आहे. हिवाळ्यात याचे सेवन केल्याने आरोग्यदायी परिणाम दिसून येतात. नियमित बदामाचे दूध घेतले तर शरीरातील अधिक समस्या दूर होतील. कारण बदामामध्ये कॅल्शियम, मॅगनेशियम, मॅंगेनिज, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई हे घटक असून ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त मानले जातात.
मसाला चहा
मसाले खासकरून थंडीच्या दिवसात आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात. मसाल्यांमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे शरिररातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही मसाल्याचा चहाचे सेवन करू शकता. यामुळे तुमचे शरीर थंडीत उबदार राहण्यास नक्कीच मदत होईल.
हॉट चॉकलेट
थंड वातावरणात प्रत्येकाला गरम पदार्थ खावेसे वाटतात. त्यामुळे जर तुम्हालाही अधिक प्रमाणात थंडी वाजत असेल तर, तुम्ही हॉट चॉकलेट पिऊ शकता. यामुळे मूड स्विंग्स नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याचबरोबर थंडीत हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त असते, याचे सेवन केल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. तसेच रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.
मध आणि हळदीचे मिश्रण
गरम पाण्यात मध आणि हळद टाकून मिश्रण टाकलेले पाणी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हळद आणि मध यांचे मिश्रण शरीराची इम्यूनिटी वाढवण्यास मदत करते, यामुळे तुमची त्वचा चमकदार राहण्यास मदत होते. तसेच थकवा दूर करते. त्यामुळे हे पेय तुम्हाला हिवाळ्यात नक्कीच उबदार आणि आरामदायी ठेवेल.
सूप
हिवाळ्याच्या दिवसात लोक सामान्यत: आजारी असतात, अशावेळी सूपचे सेवन केले जाते. परंतु निरोगी राहण्यासाठी दररोज ते पिणे आवश्यक आहे. सूपमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, अँटी-ऑक्सिडेंट आणि मॅग्नेशियमसारखे गुणधर्म आहेत. ज्यामुळे सर्दी आणि कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव होतो. हिवाळ्यात गरम सूप पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.