क्राईमताज्या बातम्या

सेक्सला नकार दिल्याने महिलेने कापला तरुणाचा प्रायव्हेट पार्ट

सोलापूर | तरुणाने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेने त्याचे प्रायव्हेट पार्ट कापल्याची घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी पोलीस ठाण्यात तरुणीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी महिलेला अटक करून न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने आरोपी महिलेला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

फिर्यादी जखमी तरुणाचे मोबाईलचे दुकान आहे. आरोपी महिला दुकानात ये-जा करत असे, त्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते. हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. यानंतर महिलेने तरुणाशी लग्न करण्याचा हट्ट धरला, मात्र महिला आधीच विवाहित असल्याने तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर मात्र, तरुणाने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मार्च 2023 मध्ये शिवाजी नगर पोलिस ठाण्यात त्याच्यावर बलात्काराचा गुन्हाही दाखल झाला होता. या प्रकरणात तरुणाला तुरुंगातही जावे लागले होते.

नेमकं काय घडलं ?

दरम्यान, गुरुवारी 21 मार्च 2024 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास महिलेने तरुणाला तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून फोन केला. त्याला गुरुवारी दुपारी अडीच वाजता बार्शी बसस्थानकावर भेटायला बोलावले. तेथून दोघेही साई समर्थ लॉजवर गेले. महिलेने तेथे शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तरुणाने केला. त्याने नकार दिला मात्र महिलेने जबरदस्तीने त्याचे कपडे काढून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर चाकूने वार केले.

महिलेवर गुन्हा दाखल..

अचानक झालेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. तरुणाला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असताना त्याला बार्शी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. सध्या त्याच्यावर येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमी तरुणाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी महिलेविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये