मैत्रिणीने चोरी करण्यास नकार दिला म्हणून तिचे दात पाडले; पिंपरी मधील विचित्र घटना
पिंपरी | पुणे तिथे काय उणे अशी म्हण आपण ऐकत आलो आहोत. पुण्यात जे काही चांगलं वाईट घडतं त्याची नोंद महाराष्ट्रासह देशभरात घेतली जाते. अशीच एक घटना पिंपरी शहरात घडली आहे. मैत्रिणीने चोरी करण्यासाठी मदत केली नाही म्हणून चोरट्याने तिला गंभीर मारहाण करत तिचे दात पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष टाक (वय 45) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला आणि आरोपी सुभाष टाक ही दोघे मित्र आहेत. टाक हा फिर्यादीला चोरीसाठी सोबत येण्याचा आग्रह करत होता.
परंतु, फिर्यादीने चोरी करण्यास नकार दिला. दरम्यान, ही बाब आरोपी टाक ह्याला रुचली नाही. त्याने महिलेकडे पैशांची मागणी केली. दरम्यान महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा देखील आरोपी टाकला राग आला. त्यामुळे चिडलेल्या टाकने महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. एवढेच नाही तर त्याने फिर्यादीच्या तोंडावर लाथ मारून चार दात पडले.