क्राईमताज्या बातम्या

खिडकी उघडी ठेवून नवविवाहित जोडप्याचं सेक्स; वैतागून शेजारी महिलेची पोलिसांत धाव

गिरीनगर | बेंगळुरूमध्ये घरासमोर राहणाऱ्या शेजऱ्यांच्या खिडकीतून दिसणाऱ्या त्यांच्या ‘अश्लील कृत्यांमुळे’ त्रासलेल्या एका महिलेने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. ही घटना दक्षिण बेंगळुरूच्या अवलहल्ली, गिरीनगर येथील आहे. येथे राहणाऱ्या एका 44 वर्षीय गृहिणीने तिच्या नवविवाहित शेजारी जोडप्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शेजारी राहणारे जोडपे हे त्यांच्या बेडरूमची खिडकी उघडून लैंगिक संबंध ठेवत असल्याचा आरोप या महिलेने दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

मात्र, या प्रकरणात नवा ट्विस्टही आला आहे. वास्तविक, नवविवाहित जोडपे ज्या घरामध्ये राहतात, त्या घराच्या मालकाच्या पत्नीने उलट शेजाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. भाडेकरूंना घर रिकामे करून देण्याच्या उद्देशाने महिलेचे कुटुंब विनाकारण भांडण करत असल्याचा आरोप शेजारी राहणाऱ्या महिलेने या प्रकरणी केला आहे. परस्पर तक्रार दाखल केल्यावर दोन्ही पक्षांनी गिरीनगर पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणामुळे पोलिसही चक्रावले होते. पोलिसांनी त्यांना सांगितले की दोन्ही तक्रारींवर एफआयआर दाखल झाल्याने दोन्ही तक्रारदारांना न्यायालयात जावे लागेल.

8 मार्च रोजी एका या प्रकरणी पोलिस ठाण्यात जात एफआयआर दाखल केली होती, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे. ही महिला झोपण्या पूर्वी घराचा दरवाजा बंद करत असतांना रात्री 10:30 च्या सुमारास तिचे लक्ष समोरच्या घराकडे गेल्यावर ती स्तब्ध झाली. शेजारी राहणारे जोडपे हे खिडकी उघडी घेऊन शरीस संबंध ठेवत होते. त्यांचे हे कृत्य अतिशय असभ्य होते. मी त्यांना खिडकी बंद करा आणि त्यांना हवे ते करा, असे सांगितले. पण त्यांनी माझे ऐकले नाही. या जोडप्याने मला शिवीगाळ केली. ऐवढेच नाही तर बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमकी देखील दिली असे या महिलेने म्हटले आहे.

दरम्यान, शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या महिलेने देखील या प्रकरणी परस्पर तक्रार दाखल केली आहे. नवविवाहित भाडेकरूच्या घरमालकाने 10 मार्च रोजी उलट तक्रार दाखल करत ‘ओपन सेक्स’ची तक्रार करणाऱ्या महिलेवर आणि तिच्या कुटुंबीयांवर तिच्या भाडेकरूंसोबत जाणीवपूर्वक भांडण केल्याचा आरोप करत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार देण्यात आली. नवविवाहित जोडपे आणि त्यांचे घरमालक आणि गृहिणी आणि तिचा पती यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हे प्रकरण आता कोर्टात पोहचले असून या व्हायरल प्रकरणाची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये