महिला प्रीमियर लीग लिलाव! 104 भारतीय तर 61 विदेशी खेळाडू होणार सहभागी
Women Premier League 2024 Auction : आयपीएलप्रमाणेच महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी देखील डिसेंबर महिन्यात लिलाव होणार आहे. मुंबईत 9 डिसेंबरला होणाऱ्या या लिलावात एकूण 165 महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम हा 2024 च्या फेब्रुवारी – मार्च महिन्यात होणार आहे.
बीसीसीआयने आज एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं. त्यात ते म्हणतात, ‘महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण 165 खेळाडूंपैकी 104 खेळाडू या भारतीय आहेत तर 61 खेळाडू या विदेशी आहेत. तर 15 खेळाडू या असोसिएट देशांशी सल्लग्नित आहेत. एकूण 56 कॅप्ट तर 109 अनकॅप्ट खेळाडू यंदाच्या लिलावात उतरणार आहेत.’
यंदाच्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावात पाच संघांसाठी जास्तीजास्त 30 स्लॉट आहेत. यातील 9 जागा या विदेशी खेळाडूंसाठी आहेत. वेस्ट इंडीजची अष्टपैलू खेळाडू डिएन्ड्रा डॉट्टीनला गुजरात जायंट्सने 60 लाखाला खरेदी केले होते. मात्र वादग्रस्तरित्या वैद्यकीय कारणांमुळे तिला वगण्यात आलं.
महिला प्रीमियर लीगमधील दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरिअर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यासाठी 30 स्लॉट रिकामे आहेत. त्यातील 9 स्लॉट हे विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत.