निसांका-परेराची 125 धावांची भागीदारी, अन् 209 धावांमध्ये लंकादहन! ऑस्ट्रेलिया अॅक्शन मोडवर
लखनौ : (World Cup 2023 Aus vs SL) ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्री लंका याच्या आज लखनऊच्या मैदानानर खेळला जात आहे. सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. श्रीलंकन फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना जबरदस्त सुरुवात करत कांगारूंची अवस्था ‘आ बैल मुझे मार’ अशा प्रकारची झाली होती.
सलामीवीर निसांका आणि कुसल परेरा यांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावा जोडत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची हवा काढली. दोघांच्या अर्धशतकी खेळीमुळे श्रीलंकेला दमदार सुरुवात करता आली. मात्र, दमदार सुरुवातीचा फायदा श्रीलंकन फलंदाजांना घेता आला नाही.
कुसल परेरा (78) आणि पाथुम निसांका (61) यांनी मोठी भागीदारी रचल्यामुळे श्रीलंकेने चांगली सुरुवात केली आणि त्यांची पहिली विकेट 125 धावांवर पडली. त्यानंतर मोठी पडझड झाली आणि ते नियमितपणे विकेट गमावत राहिले आणि त्यांचा डाव 209 धावांवर संपला.
एकेकाळी ती 300 पार करेल असं वाटत होतं. अॅडम झाम्पा (4/47) आणि पॅट कमिन्स (2/32) यांनी गडगडण्यास सुरुवात केली, तर मिचेल स्टार्क (2/43) यांनी अंतिम धक्का दिला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना पुनरागमन करण्यात यश मिळाले, अन् दमदार सुरुवात केलेल्या श्रीलंकेला 209 धावांवर रोखले.