क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

ऑस्ट्रेलियाची बाॅलिंग झालीय ‘देवळातील घंटा’! कोणीही या वाजवून जावा; अखेर सूर मिळाला

लखनौ : (World Cup 2023 Australia vs Sri Lanka) वर्ल्ड कपमध्ये पहिले दोन सामने गमावल्याने पाच वेळेचा विश्वविजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाची (Australia vs Sri Lanka) अवस्था सध्या बिकट झाली आहे. इथून पुढे त्यांचा प्रत्येक सामना हा करो वा मरो अशा स्थितीमधील असणार आहे.

श्रीलंकेने सुद्धा दोन सामने अटीतटीच्या लढतीमध्ये गमावले आहेत, तर ऑस्ट्रेलियाची कामगिरी अजूनही त्यांच्या लौकिकाला साजेशी झालेली नाही. त्यामुळे एकंदरीत आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. आजच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. श्रीलंकन फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना जबरदस्त सुरुवात करत कांगारूंची अवस्था देवळातील घंटेसारखी केली आहे, कोणीही या अन् वाजवून जावा.

सलामीवीर निसांका आणि कुसल परेरा यांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावा जोडत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची हवा काढली. दोघांच्या अर्धशतकी खेळीमुळे श्रीलंकेला दमदार सुरुवात करता आली. मात्र, दमदार सुरुवातीचा फायदा श्रीलंकन फलंदाजांना घेता आला नाही. बिनबाद 125 वरून 43.3 षटकांत सर्वबाद 209 धावांवर कोलमडला आहे. त्यामुळे शेवटी का होईना पण ऑस्ट्रोलियाच्या गोलंदाजांना सूर मिळाला आहे. दोन्ही सलामीवीर अर्धशतक करून बाद झाले. निसांका 61 धावांवर बाद झाला, तर परेरा 78 धावांवर बाद झाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये