क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

वर्ल्डकपचा महासंग्राम रंगला; न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लड गारद; 17 षटकांत तीन बाद, 94 धावा

World cup 2023 ENG Vs NZ : आयसीसीच्या वन डे विश्वचषकाला आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. गतविजेत्या इंग्लंड (England) आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड (New Zealand) संघांमधल्या सामन्यानं या विश्वचषकाची लढाई सुरु झाली. न्यूझीलंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून केली मा, त्यांनी मोठ्या धावसंख्येत रुपांतर करण्यात अपयश आलं. सलामीवीर डेविड मलानची 14 धावांवर हेन्रीनं शिकार केली. त्यामुळे मलानच्या रुपाने इंग्लंडला पहिला धक्का बसला. मलानला जीवदान मिळूनही त्याला संधीचे सोनं करता आलं नाही. इंग्लंडने 10 षटकांत 1 बाद 51 अशी मजल मारली होती.

डेविड मलान याच्यानंतर जॉनी बेअर्स्टोही बाद झाला. मिचेल सँटनरने त्याला 33 धावांवर बाद केले. रविंद्र याने हॅरी ब्रूकला बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला आहे. हॅरी ब्रूक 25 धावां काढून तंबूत परतला. वादळी सुरुवातीनंतर इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली आहे. 113 धावांत इंग्लंडचे तीन फलंदाज तंबूत परतले आहेत. बेअरस्टो 33, मलान 14 आणि हॅरी ब्रूक 25 धावा काढून बाद झाले आहेत. जो रुट आणि मोईन अली मैदानात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये