क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

भारताची सुरुवात खराब! तिन फलंदाज शुन्यावर आऊट, ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात

चेन्नई : (World Cup 2023 India Vs Australia) दोन धावांवर भारताची पहिली विकेट पडली आहे. मिचल स्टार्कच्या पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर इशान किशन झेलबाद. खातेही न उघडता ईशान पॅव्हेलियनमध्ये परतला. तर हेझलवूडच्या दुसऱ्या षटकाच्या दुरऱ्या चेंडूवर भारताचा कर्णधार रोहित भोपळाही न माघारी परतला, हा आघात ताजा असतानाच शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरही खाते न उघडता झेलबाद झाला. दोन धावांवर भारताचे तीन फलंदाज शुन्यावर बाद झाले. त्यामुळे हि भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी चिंतेची बाद ठरली आहे.

बहुप्रतीक्षित असा आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ भारतात सुरु झाला. यासोबतच आज करोडो भारतीयांची प्रतीक्षा संपली असून भारतीय संघ २०२३ विश्वचषकाच्या मोहिमेला सुरुवात झाला. भारताचा पहिला सामना पहिला सामना बलाढ्य प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना चेन्नईत सुरु आहे. या सामन्याने केवळ भारतच नाही तर ऑस्ट्रेलियाही आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. अर्थात, २०२३ च्या विश्वचषकात दोन्ही संघांपैकी कोण विजय सलामी देणार हे पाहाणं औचिक्याचे ठरले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्डकप 2023 मधील पहिल्याच सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी कांगारूंच्या फलंदाजांचा फडशाच पाडला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणे पॅट कमिन्सच्या चांगलंच अंगलट आला.

भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 199 धावात गुंडाळला. भारताकडून रविंद्र जडेजाने 3 तर कुलदीप यादव, जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या. अश्विनने 1 विकेट घेत त्यांना चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने 41 धावांचे योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये