…तर भारताऐवजी पाकिस्तान जाणार सेमी फायनलमध्ये?

World Cup Match 2022 : आज गुरुवार दि. 03 रोजी पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 33 धावांनी पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. याचबरोबर पाकिस्तानने नेट रनरेट देखील सुधारले असून यामुळे आता भारतीय संघावर दबाव वाढला आहे. भारताचा 6 नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरूद्ध सामना होणार आहे. पाकिस्तान अजूनही सेमी फायनलच्या रेसमध्ये असून जर झिम्बाब्वे संघाने काही चमत्कार केला तर पाकिस्तानची चांदी होण्याची शक्यता आहे.
भारत 6 गुणासह गुणतालिकेत सध्या अव्वल स्थानावर जरी असला तरी, रनरेट खुप कमी आहे. तर पाकिस्तान 4 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, पाकिस्तानचे रनरेट +1.085 आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानचे रनरेट हे भारताच्या (+0.730) तुलनेत चांगले आहे. त्यामुळे भारताला आपले अस्तित्त्व टिकवायचे असेल तर पुढील सामना जिंकणं गरजेच असणार आहे. आणि तर भारत या विश्वचषकातून अलगत बाहेर फेकला जाणार आहे.
झिम्बाब्वेने भारताला पराभूत केलं तर भारतचे 6 गुण राहणार आहेत. अन् दक्षिण आफ्रिकेकडून नेदरलॅंड पराभूत झाल्यास आफ्रिका 5 गुणांवरुन 7 गुणांसह पहिल्या स्थानावर जाणार आहे. आणि पाकिस्तानने बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यास पाकिस्तान 4 गुणांवरुन 6 गुणांवर जाणार आहे. त्यात पाकिस्तान रनरेट भारतापेक्षा चांगले असल्यामुळे पाकिस्तान दुसऱ्या स्थावर येणार येईल. आणि यामुळे भारत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर फेकला जाईल. यामुळे भारतीय संघाचे या विश्वचषकातील स्थान संपुष्ठात येणार आहे. अन् भारताऐवजी पाकिस्तान सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे.