क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

पाकिस्तानचे भंगले स्वप्न! भारताच्या जीव टांगणीला?

नवी दिल्ली : (World Test Championship Match) सध्या सुरु असेल्या पाकिस्तान संघाचा घरच्या मैदानावर इंग्लंडने 2-0 अशा पराभव केला. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून पाकिस्तान बाहेर गेला आहे. त्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठण्याचे पाकिस्तानचे स्वप्न भंगले आहे.

दरम्यान, पाकिस्तानशिवाय इंग्लंडचा संघही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. इंग्लंड संघ 44.44% विजयाच्या टक्केवारीसह पाचव्या क्रमांकावर आहे. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकेल का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. याचं उत्तर हो जरी असले तरी, टीम इंडियासाठी पुढचा रस्ता अजिबात सोपा असणार नाही.

भारताला बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 4 कसोटी मालिका खेळायच्या आहेत. या 6 कसोटी सामन्यांमध्ये जर टीम इंडियाने 2 कसोटी सामने गमावले तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमधून भारताचा पत्ता कट होईल. त्याचबरोबर WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला बांगलादेशचा 2-0 असा पराभव करावा लागेल. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 किंवा 3-0 अशी मालिका जिंकल्यास भारताला अंतिम फेरीचे तिकीट पक्के होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये