इतरक्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

“आम्हाला मिळालेली सर्व पदकं आम्ही गंगेत…”, कुस्तीगीरांची मोठी घोषणा; उद्यापासून ‘या’ ठिकाणी करणार आमरण उपोषण

नवी दिल्ली | Brij Bhushan Sharan Singh – कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुस्तीगीरांकडून केली जात आहे. तसंच या मागणीवर कुस्तीगीर आंदोलक ठाम आहेत. अशातच आता कुस्तीगीर हे त्यांनी कमावलेलं मेडल गंगेत विसर्जित करणार आहेत. सोबतच त्यांचं आंदोलन करण्याचं ठिकाणंही वेगळं असणार आहे.

23 एप्रिलपासून दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीगीरांचं धरणं आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करत आंदोलन संपवलं होतं.

तसंच आज (30 मे) आंदोलकांनी एक मोठी घोषणा केली आहे. देशासाठी मिळवलेले मेडल कुस्तीपटु गंगेमध्ये विसर्जित करणार आहेत. केंद्र सरकारचा निषेध आणि ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी कुस्तीपटू हे पाऊल उचलत आहेत. तर आज संध्याकाळी 6 वाजता हरिद्वार येथे गंगेमध्ये मेडल विसर्जित करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती विनेश फोगाटनं दिली. त्याचबरोबर उद्यापासून (31 मे) आंदोलक कुस्तीपटू इंडिया गेटवर उपोषणाला बसणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये