इतरक्राईमताज्या बातम्यामनोरंजन

लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले…

पुणे | Rajan Khan Son Debu Suicide – लेखक राजन खान (Rajan Khan) यांचा मुलगा डेबू (Debu) यानं आत्महत्या (Suicide) केली आहे. डेबूनं वयाच्या 28 व्या वर्षी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे. त्याच्या आत्महत्येनं सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील (Pune) मावळमधील सोमाटने फाटा येथे घडली आहे.

डेबू हा एक आयटी अभियंता होता. तो मावळमधील सोमाटने फाटा येथे राहत होता. तर सोमवारी सकाळी त्यानं एकदाही घराचं दार उघडलं नसल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यानंतर घर मालकिणीनं डेबूच्या भावाशी संपर्क साधत त्याला माहिती दिली. मग डेबूच्या भावानं डेबूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यानं फोन उचलला नाही. त्यामुळे डेबूचा भाऊ तातडीन डेबू राहतो तिथे आला. तेव्हाही डेबूनं दार उघडलं नाही. त्यामुळे त्याच्या भावानं पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी दार तोडलं. तर आत प्रवेश करताच डेबूनं बेडरूममधील पंख्याला गळफास घेतल्याचं समोर आलं.

डेबूनं इतक्या कमी वयात हा टोकाचा निर्णय घेतल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. ही धक्कादायक घटना काल संध्याकाळी समोर आली. तर डेबूनं आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यानं आत्महत्येचं कारण स्पष्ट केलं आहे.

आत्महत्येपूर्वी डेबूनं एक चिठ्ठी लिहिली आहे. आर्थिक विवंचनेतून आपण आत्महत्या करत असल्याचं डेबूनं चिठ्ठीत लिहिलं आहे. आपण आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण केली होती. त्यातून मोठा आर्थिक फटका बसल्याचा उल्लेख डेबूनं केला आहे. तसंच ज्या लोकांसोबत त्यानं आर्थिक व्यवहार केले आहेत त्यांचीही नावं त्यानं चिठ्ठित लिहिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये