पिंपरी चिंचवड

वायसीएम हॅास्पिटलमध्ये ‘रूग्णांची हेळसांड’

पिंपरी – येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय वायसीएममध्ये रुग्णांच्या सेवेसाठी डॅाक्टर आहेत की नाहीत, असा प्रश्न पडला आहे. त्याला कारण आहे तसेच आहे. मुलीच्या खांद्याला दुखापत झाली म्हणून तिचे पालक तिला या रुग्णालयात घेऊन आले. मात्र, तिच्यावर उपचार करायला त्यावेळी डॅाक्टर नव्हते. ज्यावेळी ही मुलगी या रुग्णालयात आली ती सायंकाळच्या सुमारास, तिला ओपीड ऐवजी आपत्कालीन विभागात जाऊन केसपेपर काढला होता. अर्धा तास उलटूनही तिला पाहण्यासाठी संबधित डॅाक्टर त्या ठिकाणी आलेच नाहीत. तर दुसऱ्या घटनेमध्ये कामगाराच्या हाताला फ्रक्चर झाला होता. या कामगाराला ओळखीतल्या लोकांनी या ठिकाणी उपचारासाठी आणले होते. एक तास उलटूनही कोणीही या कामगारावर उपचार करण्यासाठी तिथे आले नाहीत. बराच वेळानंतर शिकाऊ डॅाक्टर तिथे आले. त्यांनी जखमी रुग्णाला पाहिले. त्यानंतर रात्री उशिरा या व्यक्तीवर शस्त्रक्रिया करण्यात आली.  यामुळे वायसीएम रुग्णालयात रुग्णांसोबत हेळसांड केली जात असल्याचे दोन्ही प्रकार आहेत.

हेही वाचा- गुजराती कंपनीकडून पिंपरी चिंचवड पालिकेच्या तिजोरीवर डल्ला?

खरेतर पिंपरी चिंचवड महापालिकेचे  रुग्णालय आहे. अशा घटना वायसीएममध्ये रोज घडल्याची माहिती आहे. सर्वसामान्य आणि गरजू व्यक्तींना या ठिकाणी कमी शुल्कात उपचार दिले जातात. आपत्कालीन कक्षात दाखल झालेल्या रुग्णांना पाहण्यासाठी वेळेत डॉक्टर उपलब्ध न होणे, डॉक्टर उपलब्ध झाले तरी त्यांनी रुग्णाकडे लक्ष न देणे, तातडीचे वैद्यकीय उपचार आवश्‍यक असणाऱ्या रुग्णांनाही तासनतास ताटकळत ठेवणे आदी प्रकार या ठिकाणी घडत आहेत. या घटनांना आळा घालणे अत्यंत गरजेेचे आहे. येथे रुग्णाला वेळेवर उपचार न देणे, रुग्ण गंभीर असल्यास त्याचा फायदा घेऊन नातेवाइकांना रुग्णास खासगी रुग्णालयात हलविण्याबाबत सांगणे, त्याबदल्यात संबंधित रुग्णालयाकडून टक्केवारी घेण्याचा गंभीर प्रकारदेखील येथे घडत आहे. आहे. या आणि अशा अनेक गैरप्रकारांमुळे वायसीएम रुग्णालयाचा नावलौकिक धुळीस मिळत आहे.

हेही वाचा- पिंपरी चिंचवड शहरातील बीआरटी मार्गाला ग्रहण; चार मार्गांवरील बससेवा बंद

पांढरा हत्ती पोसला जातोयची टीका

दिवंगत नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या पुढाकारातून पिंपरी चिंचवड महापालिकेने वायसीएम रुग्णालय सुरू केले. सुरुवातीच्या काळात या रुग्णालयावर ‘पांढरा हत्ती पोसला जातोय’, अशी जळमळीत टीकादेखील करण्यात आली होती. सर्वप्रकारच्या रुग्णसेवा एकाच ठिकाणी मिळत असल्याने अल्पावधीतच हे रुग्णालय नावलौकिकास आले. पिंपरी चिंचवड शहरात राज्याच्याच नव्हे तर देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, बाहेरगावचे नातेवाईक हे शहराबाहेरून केवळ उपचारांसाठी वायसीएम रुग्णालयात येतात. मात्र, काही वर्षांपूर्वी वैद्यकीय सेवेत अग्रेसर असणाऱ्या वायसीएम रुग्णालयात आता परिस्थिती बदलली  असल्याचे पाहिला मिळत आहे. येथील डॉक्टर, निवासी डॉक्टर, कर्मचारी यांचे रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. वैद्यकीय पदवी घेताना रुग्णसेवेसाठी आपण कटिबद्ध असल्याची शपथ त्यांना देण्यात आली होती. मात्र, या शपथेतील सर्व नैतिकता धाब्यावर बसवून केवळ रुग्णसेवेऐवजी हितसंबंध जपण्याचा प्रकार घडत आहे. 

हेही वाचा- पिंपरी चिंचवडमधील १३ अनाधिकृत शाळांची पोलखोल; कडक कारवाईचे आदेश

काही दिवसांपूर्वी दोन डॉक्टर कट प्रॅक्टिस करत असल्याचे आमच्या निदर्शनात आले होते. त्यांच्याविषयी तक्रारी आल्यानंतर गेल्या आठवड्यातच दोन्ही डॉक्टरांना आम्ही निलंबित केले आहे. यापुढेही असा प्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाईल, अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेचे अधिष्ठाता  डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये