महाराष्ट्र

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार जोरदार सरी

महाराष्ट्रात मान्सूनचा वेग (Maharashtra Rain Alert) काहीसा मंदावल्याचं पाहायला मिळालं. मात्र पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला आहे. आज राज्यातील विविध भागांमध्ये हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तासांमध्ये मुंबईत मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता आहे.

हेही वाचा- मुंबईतील ५० हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस यंत्रणा सतर्क

कोकणात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, रत्नागिरी जिल्ह्याला पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा- विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा, या दिवशी होणार मतदान!

विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडककडाटास मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नुसता पाऊसच पडणार नसून या काळात पावसासोबतच वादळाचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये