पुण्यात पुस्तक खरेदी करण्यासाठी आलेल्या तरूणीसोबत धक्कादायक प्रकार, व्हिडीओ काढून…

पुणे | Pune Crime News – पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुस्तक खरेदी करण्यासाठी पुण्यात (Pune) आलेल्या तरुणीसोबत बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या तरूणीला (Pune news) सॉफ्ट ड्रिंकमधून (coldrink) गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (rape case pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर या तरूणीला विवस्त्र करुन तिचे अश्लील व्हिडीओ काढण्यात आले. त्यानंतर हे व्हिडीओ (porn video viral) व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून 16 लाख 86 हजार रुपये उकळले आहेत. या प्रकरणी 27 वर्षीय पीडित तरुणीनं शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पीडित तरुणी ही मूळची सांगलीतील आहे. ती पुस्तक घेण्यासाठी पुण्यात येत होती. त्यावेळी तिची बसमध्ये फहीम सय्यद याच्याशी ओळख झाली. त्यानं आपली ट्रॅव्हल एजन्सी असल्याचं तिला सांगितलं. त्यानंतर त्यांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले. त्यामुळे त्यांच्यात दररोज संभाषण होत होतं. तसंच काही महिन्यांपूर्वी पुण्यात येत असताना त्यानं तिला फोन केला. त्यावेळी दोघांनी मिळून पुस्तकाची खरेदी केली आणि त्यानंतर जेवणाच्या बहाण्यानं त्यानं तिला बालगंधर्व चौकातील एका हॉटेलमध्ये नेलं. त्यानंतर तिला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचं औषध देऊन तिला विजय लॉजवर नेलं. तिथं त्यानं तिच्यावर बलात्कार केला. तसंच तिचे विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ काढले.
या प्रकारानंतर त्यानं तिला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिची बदनामी करणार असं सांगून अनेकदा तिला धमकावण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याकडे पैशाची मागणी केली. तसंच आपली बदनामी होऊ नये, म्हणून या तरुणीनं कर्ज काढून त्याला महिन्याभरात 16 लाख 86 हजार रुपये दिले. मात्र, तरीही त्यांची मागणी थांबत नसल्यानं तरूणीनं पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी फहीम सय्यदला अटक केली आहे.