रिल्स बनवण्याच्या नादात तरुणीचा जीवघेणा स्टंट; पाहा थरारक VIDEO
आपण ती म्हण ऐकलीच असेल पुणे तिथे काय उणे. सांस्कृतिक असो राजकीय असो किंवा शैक्षणिक पुण्याची नेहमीच चर्चा रंगलेली असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुणे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. पुण्यासारख्या सांस्कृतीक शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तर इथली तरुण-तरुणी आता रिल्सच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. नुकताच एका तरुणीचा रील बनवण्याच्या नादात जीवणेघा स्टंट करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुण्यातील हडपसर भागातील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये तरुणी हात सोडून गाडी चालवताना दिसत आहे. ‘आखो मी बसे हो तुमे दिल मी छुपा लुंगा’ या गाण्यावर तरुणी रिल्स करत हा जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. याअगोदर पुण्यातील पिंपरी भागातून चालत्या कारवर बसून स्टंट करताना एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर संबंधित मुलावर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला शिक्षाही सुनावण्यात आली होती. आता या तरुणीचा जीवघेणा स्टंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलीस हिच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातात अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी वाहतूक नियम धाब्यावर बसवलेले दिसून येत आहेत. खास करुन तरुण व तरुणींकडून हे वाहतूक नियम पायदळी तुडवले जातात. असे बेजबाबदार तरुण-तरुणी वेडीवाकडे वाहने चालवून आपल्याबरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालतात. त्यामुळे तरुण-तरुणींनी अशा प्रकारचे जीवघेणे स्टंट करु नये व आपल्याबरोबर इतरांच्या जीवाची पर्वा करावी अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.