मनोज जरांगे-पाटलांवर पुष्पवृष्टी करताना जेसीबीतून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
नाशिक | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात (Maharashtra News) चर्चेत आहेत, ते त्यांच्या उपोषण आंदोलनावरुन (Maratha Reservation). काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांच्या येवल्यातील सभेवेळी जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जेसीबीवर उभे असलेले काही कार्यकर्ते खाली कोसळले होते. ते या घटनेत गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. त्यातील गोकुळ कदम या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या तरुणावर गेल्या महिनाभरापासून कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
यापैकी अरुण बोराडे यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तर गोकुळ कदम याच्यावर कोपरगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. अन्य एकावर येवला तालुक्यातच उपचार सुरु होते. या अपघातानंतर काही दिवसांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी जखमी तरुणांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती. यातील जखमी तरुण गोकुळ कदम याच्यावर कोपरगाव येथे उपचार सुरू होते उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला.