कोब्रा नागाची स्कूटी मालकाला Z+ सुरक्षा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण
मुंबई | Viral Video | सध्या सोशल मीडियाच्या जगात वावरत असताना वेगवेगळे व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये चक्क स्कूटीच्या मालकाला कोबऱ्याने Z+ सुरक्षा दिल्याचं पाहायला मिळत आहे. नक्की हे प्रकरण काय आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत. तर एका पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हा स्कूटीच्या पुढच्या भागात कोब्रा साप लपून बसल्याच व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर समोरचा भाग उघडून सापाला बाहेर काढण्याचं काम एक व्यक्ती करत आहे. असा हा कोब्रा नागाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे.
स्कूटीच्या समोर उभ्या असणाऱ्या व्यक्तीच नाव अविनाश यादव (@avinashyadav_26)असून त्याने त्यांच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेयर केला आहे. तर अविनाश त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सतत काहीना काही व्हिडीओ शेयर करत असतो. त्याच्या बायोनुसार, तो एक सर्पमित्र आहे. तर तो नियमितपणे सापांच्या विविध प्रजातींबद्दल मनोरंजक पोस्ट टाकत असतो. यावेळी त्याने टाकलेलया कोब्रा नागाच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये गंमतीने लिहिले की Activa च्या मालकाला Z+ सुरक्षा मिळाली आहे. यामुळे त्याच्या या पोस्टला सर्पप्रेमींसह अनेकांनी कमेंट करत त्याच्या हींमतीला दाद दिली आहे.
दरम्यान, व्हिडीओमध्ये त्याच्या हातात स्क्रू ड्रायव्हरही दिसतो त्याचा वापर त्याने स्कूटी समोरून उघडण्यासाठी केला आहे. तर स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने कोब्रा साप बाहेर काढताना दिसत आहे. हातात कोणतंही शस्त्र नसताना देखील त्याने या सापाला सुखरूपपणे बाहेर काढलं असल्याचं पाहायला मिळत आहे. अविनाशने ज्या पद्धतीने अॅक्टिव्हा स्कूटीमधून साप बाहेर काढला ते खरोखरच धाडसाचं होतं यामुळे त्याचं कौतुक देखील सोशल मीडियावर होत आहे.