कोरोना काळात ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला ; राहुल गांधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळामध्ये सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले . याचप्रकारणावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर ट्विटवरून निशाणा साधला आहे. त्यांनी असा दावा केला की , सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाच्या काळात ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला. तर सर्व मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी अशी मागणी ही त्यांनी केली.
याचप्रमाणे गांधी यांनी ट्विटरवर, न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर ही केला आहे, ज्यात दावा केला आहे की भारत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या सार्वजनिक करण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये आडकाठी करत आहे.
तसेच ‘मोदीजी स्वतः खरे बोलत नाहीत ना इतरांना बोलून देतात . ते तर आताही खोटे बोलत आहेत की ,कोरोना काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणीही मरण पावले नाही,असा आरोपही गांधी यांनी यावेळेस लगावला . मोदीजी आतातरी तुमची जबाबदारी पार पाडा प्रत्येक पीडित कुटुंबाला प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई द्या असं ही राहुल गांधींनी म्हटलं.