वादग्रस्त पुस्तकावर जेम्स लेनने केला मोठा खुलासा म्हणाले…

जेम्स लेनने छञपती शिवाजी महाराजांवर एका वादग्रस्त पुस्तकात केलेल्या वक्तव्यावरुन सध्या चांगलेच वातावरण तापले आहे. राज्यात आधीच राजकीय वातावरण गरम आसताना आता यामुळे आणखीनच भर पडली आहे. या वादग्रस्त वक्तव्यावरुन राजकीय पक्ष आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. छत्रपती शिवरायांबाबत जेम्स लेन यांनी लिहिलेल्या पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी माहिती पुरवल्याच्या आरोपावरून राज्यात राजकारण पुन्हा ढवळून निघालं आहे. मात्र यानंतर आता एक वेगळी बातमी समोर आली आहे. लेखक जेम्स लेननं स्वत: यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. आता या वादाला कोणते रुप प्राप्त होते हो पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
पुढे माहिती देताना लेखक जेम्स लेन म्हणाले, ‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या जेम्स लेन लिखित पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे हे माहितीचा स्त्रोत नव्हते. इंडिया टुडेनं ई-मेलद्वारे त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत या पुस्तकाबाबत त्यांनी भाष्य केलं असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या पुस्तकात आपण कुठलाही ऐतिहासिक दावा केला नसून ‘त्या’ पुस्तकासाठी कुणीही माहिती पुरवली नसल्याचा दावा जेम्स लेननं केला आहे. यावरुन आता राष्ट्रवादी आणि मनसे वाद चिघळण्याची दाट शक्यता आहे.
याशिवाय हे पुस्तक लिहीताना बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही जेम्स लेननं या मुलाखतीत सांगितलं आहे. राजकीय स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी सुरु असुन पुरंदरे यांनी जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली असा आरोप शरद पवार यांनी केला होता. यावर जेम्स लेन यांनी स्पष्टीकरण दिल आहे. यावरुनआ आता राजकीय वातावरण चांगलेच हे माञ नक्की. राज ठाकरे यांनी आज पुणे येथिल पञकार परिषदेत एक पञ समोर आनले आहे.