पुणे : रस्ते अपघाताचं प्रमाणं वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं असून राज्यात दरवर्षी अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तत्काळ मदत करुन त्याचा जीव वाचवणाऱ्या जीवनदूतास रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालय, दिल्ली यांच्यामार्फत प्रोत्साहनपर 5 हजार रुपये बक्षीस देण्यात येते, अशी माहिती जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव तथा पुण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली.
तसेच अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यास त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. त्यामुळे दररोजचे वाढणारे अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होईल या दृष्टीने अपघातग्रस्तास तत्काळ मदत करावी, असे आवाहन पोलीस आणि परिवहन विभागाकडून वेळोवेळी करण्यात येते परंतु अजूनही मदत योग्यवेळी काही ठिकाणी न पोहचल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. .
यासाठी मदत करणाऱ्यां जीवनदूतासच्या संख्येत वाढ व्हावी, या उद्देशाने परिवहन विभागाकडून ही योजना राबविण्यात येते. योजनेची माहिती https://morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत कार्यकर्त राहणार आहे.तसेच अपघात झालेल्या व्यक्तीच्या मेंदूला मार लागणे, अतिशय रस्तस्त्राव होणे आदी गंभीर इजा झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तीस तत्काळ रुग्णालयात दाखल करणे. अशा प्रकारची मदत जीवनदूताकडून झाली पाहिजे अशा जीवनदूताची निवड हि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार आहे.