अभिनेत्री अमृता खानविलकरने सांगितला ‘चंद्रमुखी’ च्या शूटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

मुंबई : सध्या विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. तसंच ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारत आहे. त्याचबरोबर अमृताने नुकतंच तिचा चंद्रा या भूमिकेबद्दलचा प्रवास आणि त्यातील काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने चंद्रमुखी आणि नथ याबद्दलचा एक किस्सा शेअर केला आहे. यासोबत तिने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओत तिचे नाक टोचत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावेळी तिला होणारा त्रासही दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने नथीचा किस्सा सांगितला आहे.

“नथ आणि चंद्रमुखी… माझ्या दिग्दर्शकाला प्रसाद ओकला सगळं ओरिजिनल हवं होतं…. तेव्हा “अमृता नाक टोचायचं…. क्लिपवाल्या नथी मी तुला घालू देणार नाही” असं त्यांनी पहिल्याच मीटिंग मध्ये सांगितलं… आणि म्हणूनच अश्या पद्धतीने मी अडीच वर्षांपूर्वीच नाक टोचलं. त्यानंतरही ते बुजलं….दुखलं…..मग परत टोचावं लागलं… पण शूटिंगपर्यंत नथ आणि माझी जुगलबंदी सुरूच राहिली…. त्यात पु.ना, गाडगीळ ह्यांनी खऱ्या सोन्याच्या नथीं केल्या तेव्हा नाचताना त्या इतक्या जड होत असत, कि पॅक-अप नंतर त्यावरचं रक्त आधी कोमट पाण्याने आम्ही काढायचो आणि मग नथ काढायचो. तर चंद्राची कुठली नथ तुम्हाला जास्त आवडली ओ ?”, असं अमृताने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Sumitra nalawade: