IPL 2023 KKR Vs PBKS : कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जने 20 षटकात 191 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबकडून राजपक्षेने 32 चेंडूत 50 तर कर्णधार शिखर धवनने 29 चेंडूत 40 धावा ठोकल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी रचली. दरम्यान, पंजाबचे 191 धावांचे आव्हान घेऊन मैदनात उतरण्याच्या तयारीत असलेल्या केकेआरला मैदानावर उतरण्यात जवळपास अर्धा तास उशीर झाला. यात केकेआरचा काही दोष नव्हता.
पंजाब किंग्जने आपला डाव संपवल्यानंतर जवळपास अर्धा तास सामना थांबला होता. नियमानुसार दुसरी इनिंग ही 10 मिनिटात सुरू होणे आवश्यक असते. मात्र केकेआर आणि पीबीकेएस विरूद्धचा सामना जवळापस अर्धा तास सुरू झाला नव्हता. सामना सुरू असलेल्या मोहालीमधील आय. एस. बिंद्रा स्टेडियमवरील फ्लड लाईढ सुरू होण्यात काही तांत्रिक अडचणी आल्याने जवळपास 15 मिनिटे उशीर झाला. यानंतर खेळाडू मैदानाबाहेर गेले. त्यानंतर काही वेळाने फ्लडलाईट्स सुरू झाल्या आणि सामना देखील सुरू झाला.
दरम्यान, सामन्याला अर्धा तास उशीर झाल्याचा फटका पुढेही बसला. सामन्याची 16 षटके झाली असताना पावसाला सुरूवात झाली. खेळ थांबला त्यावेळी केकेआरने पंजाबच्या 191 धावांच्या प्रत्युत्तरात 16 षटकात 7 बाद 146 धावा केल्या होत्या. त्यांना अजून विजयासाठी 24 चेंडूत 46 धावंची गरज होती.