ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. संजय राऊत यांचे अलिबाग मधील ८ फ्लॅट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता विरोधी पक्ष भाजपाकडून संजय राऊतांवर निशाणा साधण्यात येत आहे. तसंच ईडीच्या कारवाईनंतर आता संजय राऊतांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले, ‘कुठली प्रोपर्टी? आम्ही काय प्रोपर्टी वाले लोक आहोत का? २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. मी आत्ता टीव्ही वर पाहिलं की मालमत्ता जप्त केली आहे. हे काय आर्थिक गैरव्यवहार म्हणतात ना, एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपाला दान करायला तयार आहोत.’

Sumitra nalawade: