नवी दिल्ली: बुधवारी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिल्लीमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मंगळवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केल्यानंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांतील घडामोडींना उधाण आलं आहे. त्यामुळे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीत केंद्रीय सरकारी यंत्रणांकडून महाराष्ट्रात होणाऱ्या कारवायांसदर्भात चर्चा होईल अशी सर्वांना अपेक्षा होती मात्र ; त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं मोदींच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
पवार म्हणाले, लक्षद्वीपच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्रातील कारवायांसदर्भात पंतप्रधान मोदींशी कुठलीही चर्चा झाली नाही. संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा मुद्दा यावेळी मांडला. मंत्री नवाब मलिक यांच्यावरील कारवाईसंबंधी यावेळी कुठलीही चर्चा झाली नाही. विधानपरिषदेच्या बारा आमदारांच्या प्रलंबित नियुक्त्यांवर या बैठकीत चर्चा झाली.” बारा आमदारांवर कारवाईची गरजच काय होती? असा सवालही पवारांनी उपस्थित केला होता.
View Comments (0)