उद्धव ठाकरे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

नागपूर-नागपूरमध्ये राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे udhav thakare यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadanvis यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते, आमदार अनिल परब, आमदार भास्कर जाधव, आमदार सचिन अहिर, आमदार संजय पोतनीस, आमदार वरुण सरदेसाई आदी नेते उपस्थित होते.

Rashtra Sanchar: