उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे शाळांना …या तारखेपासून उन्हाळी सुट्ट्या

पुणे : इयत्ता नववी ते दहावी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा संपवून ३० एप्रिलपर्यंत निकाल जाहीर करण्याच्या सूचना ‘राज्य शिक्षण मंडळा’ने शाळांना दिली आहे. दिवसेंदिवस वाढणारी उष्णतेची तीव्र लाट या पार्श्वभूमीवर ही सूचना देण्यात आली आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा, मूल्यमापन आणि निकाल ही सर्व कामे ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले आहेत.

उन्हाळी सुट्टी २ मे ते १२ जून या कालावधीत असणार आहे. २०२२-२३ हे नवे शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार आहे. अलीकडे महाराष्ट्रातील उन्हाळा अधिकाधिक तीव्र होत असल्याने विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी इयत्ता दहावी आणि बारावीच्या शालांत परीक्षा राज्य शिक्षण मंडळाने यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. या दोन्ही परीक्षांच्या निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी, मे आणि जूनमध्ये हे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षणमंञी वर्षा गायकवाड यांनी यापुर्वीच शाळांना यावर्षी उन्हाळी सुट्ट्या मिळणार नसल्याचे जाहिर केले होतो.

admin: