“कारवाई झाली की बोंबलायचं”; नारायण राणेंचा राऊतांवर घणाघात

सिंधुदुर्ग : राज्यातील अनेक नेते सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. यैातच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याही संपत्तीला टाच लावत लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं जप्ती केली होती. ईडीच्या कारवाईनंतर आज राऊत मुंबई विमानतळावर दाखल होताच शिवसैनिकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.

शिवसैनिकांनी ढोलताशांच्या गजरात राऊतांच स्वागत करत फटाकेही फोडले. याच प्रकरणावर आता भाजप नेते नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करताना राणे म्हणाले की, काळा पैसा मिळवायचाय, अन् कारवाई झाली की बोंबलायचं अशी राऊतांची अवस्था झाली आहे.

त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर आहे, असा सवालही राणेंनी यावेळेस विचारला आहे.

admin: