चांदणी चौक उद्घाटन! BJP तील वाद चव्हाट्यावर! मेधा कुलकर्णींचे चंद्रकांत दादांवर आरोप

पुणे : (Medha Kulkarni On Chandrakant Patil) पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाच उद्घाटन होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या पुलावरुन आता नाराजीनाट्य सुरु झालं आहे. या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे. याच उद्घाटन सोहळ्यात डावलल्याचा आरोप भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Megha Kulkarni) यांनी केला आहे. कोथरुडमधील सध्याचे नेते माझं अस्तित्व मिटवण्याचं काम करत असल्य़ाचं त्यांनी म्हटलंय. चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं पोस्टर ट्विट करत त्यांनी हा आरोप केला आहे.

‘माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितिन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी?

स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”. अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?, असा प्रश्न त्यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.

Prakash Harale: