…तरी मी त्यापुढे गुडघे टेकणार नाही- संजय राऊत

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. संजय राऊत यांचे अलिबाग मधील ८ फ्लॅट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता विरोधी पक्ष भाजपाकडून संजय राऊतांवर निशाणा साधण्यात येत आहे. तसंच ईडीच्या कारवाईनंतर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रीया देत मोदी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

संजय राऊत म्हणाले, ‘तुमचा बाप जरी खाली आला तरी, मी त्यापुढे गुडघे टेकणार नाही. डोक्यावर बंदुक लावाल ना माझ्या तरी मी तयार आहे. असं आव्हान त्यांनी केंद्रिय यंत्रणांना दिलं आहे. माझा हिरेन पांड्या होण्याची भिती आहे. कधीही हल्ला होऊ शकतो.’ असंही राऊत म्हणाले.

‘ज्या पद्धतीनं आम्ही सरकार स्थापन केलं आहे. या पद्धतीने राज्यातील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी राज्यसभेत व्यंकय्या नायडूंना पत्र लिहीलं आहे. केंद्रातील यंत्रणा मोठ्या प्रमाणात राज्यांवर खार खाऊन आहेत. आमच्या कष्टाच्या पैशातून आम्ही संपत्ती घेतली आहे. त्यामुळे संपत्ती काढून दाखवा, माझी सगळी मालमत्ता भाजपच्या नावावर करीन.’ असंही संजय राऊत म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले, ‘जे नाचे आता नाचत आहेत. हा राजकीय दबाव आहे. भाजपला मिळणाऱ्या देणगीदारांची चौकशी व्हायला हवी. हा एक सूड आहे. मराठी लोकांना यातून तुमचा खरा चेहरा कळेल.’

Sumitra nalawade: