त्यांना मुख्यमंत्रीपद हवंय की, सेनाप्रमुखपद?; शक्तिप्रदर्शन कशासाठी? : नारायण राणेंची राऊतांवर टीका

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत ईडीच्या कारवाईनंतर आज दिल्लीहून मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या लाखो कार्यकर्त्यांनी विमानतळ परिसरात एकत्र येऊन राऊतांचे ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत केले आहे. या स्वागताला शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत टीका केली आहे.

नारायण राणे ट्विटच्या माध्यमातून म्हणाले की, “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?? काळा पैसा मिळवायचाय, अन् कारवाई झाली की बोंबलायचं.. त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? असे म्हणत संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर?”

यानंतर संजय राऊत यांनी म्हटले आहे की, “हे शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन नाही. ही लोकांच्या मनातील चीड आणि संताप आहे. आज आयएनएस विक्रांतप्रकरणी जो घोटाळा झाला आहे त्याविरोधात शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानं आज महाराष्ट्रातील गावपातळीवर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन शिवसेना आणि इतर नेत्यांवर हल्ले केले जात आहेत. ही सुरुवात असून आता ठिणगी पडलेली आहे. यापुढे जसजशी भाजपची पावलं पडतील तशी आमची पावलं पडतील. मी फक्त निमित्त आहे, महाराष्ट्रात माझ्यासारख्या असंख्या राजकीय कार्यकर्त्यांवर नेत्यांवर तसेच भाजपच्या राजकीय विरोधकांवर कारवाया सुरु आहेत. पवार साहेबांनी याबाबतची तक्रार पंतप्रधानांकडं मांडली आहे”

Dnyaneshwar: