दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर सुरक्षा दलानं दिलं प्रत्युत्तर; दोन दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मिरच्या श्रीनगरमध्ये केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सहभागी असलेले दोन पाकिस्तानी लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी आज शहरात झालेल्या चकमकीत ठार झाले आहेत. तसंच तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. बिशंबरनगर भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला होता. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

सीआरपीएफ जवानांवर ४ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याच्या दिवसापासून पोलिस दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा पाठलाग करत होते. रविवारी त्यांचा ठावठिकाणा शोधून काढल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली, असं काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले आहेत. दहशतवाद्यांची हत्या हे पोलिस आणि सीआरपीएफचे मोठे यश आहे. ‘मला संदेश द्यायचा आहे की जो कोणी निष्पाप पोलिस कर्मचारी, नागरिक, पत्रकार किंवा कोणावरही हल्ला करेल, मग तो पाकिस्तानी असो वा स्थानिक दहशतवादी मारला जाईल, असंही ते म्हणाले.

Sumitra nalawade: