धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात दिवसभरातील दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : (Maratha Reservation) मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुसाईड नोट लिहून हिंगोलीत (Hingoli) तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तो, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात देखील आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने शाळेतील पाटीवर सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. गणेश काकासाहेब कुबेर असे आत्महत्या करणाऱ्या या तरुणाचे नाव आहे.

मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरच्या आपतगाव येथे एका मराठा तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. गणेश काकासाहेब कुबेर असे या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या युवकाच नाव आहे. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत माझ्यावरती अंत्यसंस्कार करू नका असे एक शाळेतील पाटीवर लिहून या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गणेश कुबेर याने आत्महत्या केल्याची घटना कळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. तर, घटनास्थळी चिखलठाणा पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी देखील पोहचले आहेत. मात्र, गावकऱ्यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत, आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या पत्नीला किंवा मुलांना शासकीय नोकरी देण्याची मागणी केली आहे. याबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात देणार नसून, अंत्यसंस्कार देखील करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. तर, पत्नीसह दोन मुलं आणि आई-वडील असे गणेशचे कुटुंब आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी हिंगोलीत देखील अशीच घटना समोर आली होती. हिंगोलीच्या देवजना गावामध्ये आज सकाळी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कृष्णा कल्याणकर या पंचवीस वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या शेतात असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या युवकाकडून एक सुसाईड नोट सुद्धा पोलिसांना मिळाली असून, यामध्ये मराठा आरक्षणामुळे आत्महत्या करत असल्याचे मयत कृष्णा कल्याणकर या युवकाने लिहून ठेवले आहे. याबाबत माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. तर, पोलिसांकडून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, मराठवाड्यात मराठा आरक्षणासाठी एकामागून एक आत्महत्या होत असल्याने खळबळ उडाली आहे.

Prakash Harale: